Uday Samant : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरु राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अंजली दमानियांच्या आरोपांनुसार, रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात 177 वेळा तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अशोक खरातला 17 फोन केल्याचे पुराव्यांमध्ये दिसत आहे. हे कॉल नेमके कशासाठी केले? असा थेट प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
दमानिया यांच्या आरोपावर मंत्री उदय यामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंतांनी फोन केलाय का? आता ज्यांचं फोनवर बोलणं झालंय, त्यांनी अशोक खरातच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. आता त्याने या नेत्यांशी बोलणं झाल्यावर त्याचा गैरफायदा घेऊन हे कृत्य केलं आहे. मात्र ही वृत्ती संपुष्टात आणण्याची भूमिका शिवसेनेची आहे असे सामंत म्हणाले. आमच्या बाजूला येऊन काही लोक फोटो घेतात. मग त्याने काही चुकीचं कृत्य केलं तर त्यात आम्ही सामील आहोत का? असा सवाल सामंत यांनी केला,
जाणीवपूर्वक एमएनजीएल गॅसचा पुरवठा केला जात नसेल तर कडक कारवाई करु
एमएनजीएल कडून हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवण्यास दिरंगाई होत आहे. याबाबत मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली. एमएनजीएल गॅसचा पुरवठा जाणीवपूर्वक केला जात नसेल तर कडक कारवाई करु असा इशारा मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिकांना एमएनजीएल गॅस देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मात्र जाणीवपूर्वक आर्टिफिशियल तुटवडा निर्माण होत असेल तर सरकारकडून कडक कारवाई केली जाईल असे सामंत म्हणाले.
मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक स्तरावर ‘लिक्विफाइड नॅचरल गॅस’ (LNG) च्या वाहतुकीत अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (MoPNG) नागरिकांना दैनंदिन वापरासाठी 100 टक्के सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. तर व्यवसायिक वापरासाठी 80 टक्के पुरवठा करण्याचे निर्देशित केले आहे.
हॉटेल व्यवसायीकांना करावा लागतोय अडचणींचा सामना
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. अशात भारतावर देखील या युद्धाचा परिणाम होत आहे. एलपीजी गॅस पुरवठ्यात घट झाल्यानंतर आता पाईपलाईन गॅसमध्येही कपात झाल्यानं हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग, मेस तसेच इतर व्यावसायिक यांना दुहेरी फटका बसत आहे. त्यामुळं व्यावसायिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केलीय. गॅस अभावी व्यवसायावर परिणाम होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारने गॅस वितरकांना व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मर्यादित ठेवण्याच्या सूचना दिल्या असून, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांनाच प्राधान्य देण्याची निर्देश दिलेत. सरकारच्या निर्णयामुळं घरगुती गॅस आणि सीएनजी पुरवठा सुरळीत ठेवण्याचा उद्देश असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळं सामान्य घरगुती ग्राहकांवर सध्या परिणाम जाणवत नसला तरी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात कपातीमुळं हॉटेल आणि केटरिंग, रेस्टॉरंट व्यवसायिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय.


