Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पुण्यात नराधम पतीकडून पत्नीचा अमानुष छळ; गुप्तांगावर ॲसिड ओतलं अन्….

Pune Crime: पुण्यात नराधम पतीकडून पत्नीचा अमानुष छळ; गुप्तांगावर ॲसिड ओतलं अन्….

Pune Crime: पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन परिसरातून माणुसकीला लज्जास्पद वाटणारी एक अत्यंत भीषण घटना उघडकीस आली आहे. चारित्र्याचा संशय आणि मुलगा होत नसल्याच्या रागातून एका २४ वर्षीय विवाहितेवर तिच्या पतीने अमानुष अत्याचार केले. पीडितेच्या गुप्तांगावर ॲसिड ओतून तिला दोन आठवडे उपचाराविना घरात कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

संशय आणि मुलगा नसल्याचा राग
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, तसेच मुलगा होत नसल्याने तो वारंवार तिला त्रास देत असे. २० एप्रिल रोजी मद्यधुंद अवस्थेत त्याने पत्नीशी वाद घातला. “तुझे कोणाशी प्रेमसंबंध आहेत?” असा जाब विचारत त्याने तिला बेदम मारहाण केली. क्रूरतेचा कळस गाठत या नराधमाने पत्नीच्या शरीरावर ॲसिड ओतले. वेदनेने व्याकुळ झालेल्या पत्नीला त्याने घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आणि दरवाजा आतून बंद करून घेतला.

१५ दिवस नरकयातना आणि अखेर सुटका
पत्नी गंभीर जखमी असतानाही “उपचारासाठी पैसे नाहीत” असे म्हणत आरोपीने तिला रुग्णालयात नेले नाही. कोणालाही माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत तिला १५ दिवस घरातच डांबून ठेवले. अखेर ९ मे रोजी पती घराबाहेर गेल्याची संधी साधून पीडितेने आपल्या दोन लहान मुलींसह तिथून सुटका करून घेतली आणि आपले माहेर गाठले. माहेरच्या लोकांनी तिची अवस्था पाहून तत्काळ पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांची कारवाई आणि उपचार
उरुळी कांचन पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत पीडितेला तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस निरीक्षक सचिन वांगडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!