Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून मोठी कारवाई; “फिजिक्स” तज्ज्ञ मनीषा हवालदार CBI च्या ताब्यात

नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून मोठी कारवाई; “फिजिक्स” तज्ज्ञ मनीषा हवालदार CBI च्या ताब्यात

NEET Paper Leak : देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले असून पुण्यातून आणखी एका महत्त्वाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित माहिती लीक केल्याच्या आरोपावरून मनीषा संजय हवालदार यांना CBI ने ताब्यात घेतले आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, मनीषा हवालदार या पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेत कार्यरत होत्या. परीक्षा प्रक्रियेशी संबंधित जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांना भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत प्रवेश मिळत होता. याच दरम्यान काही संवेदनशील माहिती बाहेर गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

CBI कडून सध्या जप्त करण्यात आलेले मोबाईल फोन, लॅपटॉप, कागदपत्रे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची सखोल तपासणी सुरू आहे. याआधी अटक करण्यात आलेल्या आरोपींशी मनीषा हवालदार यांचे संबंध होते का, तसेच प्रश्नपत्रिका लीक करण्यामागील संपूर्ण नेटवर्क कसे कार्यरत होते, याचा तपास सुरू आहे.

NEET UG परीक्षा पेपरफुटी प्रकरण समोर आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर NTA आणि परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. या प्रकरणाचा तपास सध्या CBI कडून विविध राज्यांमध्ये सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे, लातूर, नाशिक, अहिल्यानगर, दिल्ली आणि जयपूरसह विविध ठिकाणांहून आतापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण रॅकेटमागील मुख्य सूत्रधार, आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!