Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचा नवा प्रताप! त्याच्या आणि पत्नीच्या नावे 2 मतदारसंघात 4 मतदान कार्ड

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचा नवा प्रताप! त्याच्या आणि पत्नीच्या नावे 2 मतदारसंघात 4 मतदान कार्ड

पुणे: कोथरूडमधील गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्यानंतर चर्चेत आलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पोलिस कारवाई सुरू असताना तो पत्नी आणि मुलासह युरोपला निघून गेला होता. दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी नवा खुलासा करत घायवळ आणि त्याच्या पत्नीच्या नावावर एकाचवेळी दोन वेगळ्या मतदारसंघांत चार मतदान ओळखपत्रे असल्याचे समोर आणले आहे.

पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात निलेश आणि त्याची पत्नी स्वाती घायवळ यांच्या नावावर प्रत्येकी दोन मतदान ओळखपत्रे नोंदवली गेल्याचे आढळले आहे. त्यात वय, नाव आणि आडनावात फेरफार केल्याचे धक्कादायक वास्तवही उघडकीस आले.

हेही वाचा – Pune Crime: कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ स्विझर्लँडला पळाला; पोलिसांनी 10 बँक खाती गोठवली

नावे व कार्ड क्रमांक:

  • निलेश बन्सीलाल गायवळ (कोथरूड) – ओळखपत्र क्र. DRD1360288 (वय 47)
  • निलेशकुमार गायवळ (कर्जत-जामखेड) – ओळखपत्र क्र. TKM8217994 (वय 48)
  • स्वाती निलेश गइवाल (कोथरूड) – ओळखपत्र क्र. SAO7387947 (वय 42)
  • स्वाती निलेश घायवळ (कर्जत-जामखेड) – ओळखपत्र क्र. TKM8218026 (वय 33)

कर्जत-जामखेड मतदारसंघातील या दोन कार्डांची नोंद सलग क्रमांकाने (297 आणि 298) झालेली दिसते. म्हणजेच एकत्रित पद्धतीने नावनोंदणी केली गेली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या प्रकरणावर बोलताना आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार म्हणाले की, एकाच कुटुंबाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या नावांनी मतदार कार्डे मिळवली आहेत. हे अत्यंत गंभीर असून निवडणूक आयोगाच्या यंत्रणेतील त्रुटी उघड करणारे आहे. घायवळ दाम्पत्याने कधी ‘गायवळ’, तर कधी ‘गइवाल’ अशी आडनावे बदलली आहेत. वयामध्येही मोठे फरक दाखवले आहेत. ही उघडकीस आलेली घटना अपवाद नसून अशा हजारो नोंदी महाराष्ट्रभर असण्याची शक्यता आहे. याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!