Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शेअर मार्केटमध्ये ‘अच्छे दिन’; तब्बल 45000 कोटींची केली कमाई, टाटा कंपनीच्या…

शेअर मार्केटमध्ये ‘अच्छे दिन’; तब्बल 45000 कोटींची केली कमाई, टाटा कंपनीच्या…

मुंबई : शेअर मार्केटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. त्यातच मागील आठवडा शेअर बाजारासाठी एक उत्तम आठवडा ठरला. मुंबई शेअर बाजाराच्या ३० शेअर्सच्या सेन्सेक्समधील टॉप १० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या बाजारमूल्यात वाढ झाली.

बाजारमूल्यात वाढ झालेल्या यादीत मुकेश अंबानींच्या रिलायन्सपासून सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेलपर्यंत आणि टाटा कन्सल्टन्सीपासून इन्फोसिसपर्यंतच्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांचे बाजारमूल्य ₹१.९४ लाख कोटींनी वाढले. टीसीएसच्या शेअर्समधील गुंतवणूकदारांनी सर्वात जास्त नफा मिळवला, फक्त पाच ट्रेडिंग दिवसांत ४५००० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. गेल्या आठवड्यात अनेक प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे शेअर बाजाराला चालना मिळाली.

संपूर्ण आठवड्यात बीएसई सेन्सेक्स १२९३.६५ अंकांनी वाढला. सेन्सेक्सच्या ज्या आठ कंपन्यांचे बाजारमूल्य वाढले त्या म्हणजे आरआयएल, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, बजाज फायनान्स आणि इन्फोसिस या कंपन्यात आहेत. त्यांच्या बाजार भांडवलात एकत्रितपणे १९४१४८.७३ कोटींची वाढ झाली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!