पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय अधिकारी आयुष, एमबीबीएस, स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट, कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य यांसह इतर अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ४ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय अधिकारी आयुष, एमबीबीएस, स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट, कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, एनटोमॉलॉजिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, टिबी पर्यवेक्षक, सायकॉलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, समाज कार्यकर्ता, लेखापाल, कार्यक्रम सहाय्यक सांख्यिकी, निम वैद्यकिय कृष्ठरोग कर्मचारी, आरोग्य सेविका, कार्यक्रम समन्वयक व गटप्रवर्तक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सिंधुदुर्ग येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
या प्रक्रियेंतर्गत 190+ रिक्त पद भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२५ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 18000 ते 125000 पर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी मु.पो ओरोस तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


