Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दसरा मेळाव्यादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; सिंधुदुर्गातील ‘एकनिष्ठ’ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

दसरा मेळाव्यादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; सिंधुदुर्गातील ‘एकनिष्ठ’ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दसऱ्याच्या शुभदिनीच कोकणातून मोठा धक्का बसला आहे. सिंधुदुर्गातील माजी आमदार आणि ठाकरेंचे एकनिष्ठ समजले जाणारे नेते राजन तेली यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. कोकण हा एकेकाळी शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला समजला जायचा. मात्र, गेल्या काही वर्षांत या भागात ठाकरे गटाला सातत्याने धक्के बसत आहेत. अनेक प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता दसरा मेळाव्याच्या महत्त्वाच्या दिवशी राजन तेली यांच्या पक्षांतराने ठाकरे गटाला आणखी एक हादरा बसला आहे. या घडामोडीमुळे कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

मुंबईतील नेस्को येथे आयोजित शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात हा प्रवेश सोहळा पार पडला. राजन तेली यांनी यापूर्वी 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष (भाजप) सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांच्याविरोधात पराभव झाला होता. आता, पुन्हा एकदा राजकीय वळण घेत तेली यांनी शिंदे गटात प्रवेश करत ठाकरेंना धक्का दिला आहे.येत्या काळात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्षांतर ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कोण आहेत राजन तेली?

राजन तेली यांचा जन्म 25 जून 1970 साली कुडाळ तालुक्यातील घोडगे या गावात झाला. 1985 साली त्यांनी कणकवली येथील महाविद्यालयातच विद्यार्थी सेनेचे प्रतिनिधित्व केले.

-1988 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मध्ये शिवसेना शाखाप्रमुख पद.

-1991 साली त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती.

आणखी शोधा

सातारा बातम्या

पुणे बातम्या

अहमदनगर बातम्या

गुंतवणूक सल्ला सेवा

पर्यटन अनुभव

अंदमान आणि निकोबार

प्रॉपर्टी खरेदी मार्गदर्शन

मराठी बातम्या ॲप

अर्थ बातम्या

राज्य बातम्या

-1995 साली त्यांनी जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष म्हणून पद भूषविले.

-1997 साली त्यांच्यावर कोकण सिंचन महामंडळाची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी.

-2005 साली राणे समवेत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत तर राणे समवेत राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश.

-2007 साली विधान परिषद आमदार.

-2012 साली सिंधुदुर्ग जिल्हा सहकरी बँक चेअरमन.

-2016 साली राजन तेली यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी देत राज्य सचिव पद दिलं.

-2020 साली भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पद.

-2014 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक राजन तेली यांनी भाजपकडून लढवली होती. त्यावेळी शिवसेनेच्या दीपक केसरकर यांनी त्यांचा पराभव केला.

-2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपा व शिवसेनेची युती होती. युतीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाल्याने दीपक केसरकर हे शिवसेनेचे उमेदवार होते. यावेळी राजन तेली यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळीही त्यांचा पराभव झाला.

-2024 मध्ये राणे कुटुंबाच्या वर्चस्वाला विरोध, BJP ला रामरा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!