Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बीड हादरलं..! बापाचा १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार

बीड हादरलं..! बापाचा १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार

Beed Crime News Update : बीड जिल्ह्यातील केज शहरात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र पित्याने १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आई आणि सावत्र पित्यासोबत राहत होती. ९ एप्रिल रोजी आई माहेरी गेल्यानंतर मुलगी घरी एकटी होती. याचवेळी आरोपी घरी आला आणि परिस्थितीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला.

घटनेदरम्यान आरोपीने आपल्या लहान मुलाला मोबाईल देऊन बाजूला बसवले आणि पीडितेवर जबरदस्ती केली. मुलीने विरोध करत आईला सांगण्याची भीती व्यक्त केली असता, आरोपीने तिला धमकावत गप्प बसवले.

आई घरी परतल्यानंतर मुलगी रडत असल्याचे पाहून तिने चौकशी केली. सुरुवातीला मुलगी घाबरलेली असल्याने काही बोलली नाही, मात्र आईने विश्वासात घेतल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार उघड केला.

यानंतर १२ एप्रिल रोजी केज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!