Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवरून वाद पेटला; वर्ध्यात 600 शेतकरी, 5000 ग्राहक आक्रमक, मंत्रालयापर्यंत लढ्याची तयारी

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवरून वाद पेटला; वर्ध्यात 600 शेतकरी, 5000 ग्राहक आक्रमक, मंत्रालयापर्यंत लढ्याची तयारी

Tukaram Mundhe : वर्ध्यातील गो-संवर्धन गोरस भंडारवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने केलेल्या कारवाईनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ आणि असुरक्षित उत्पादनाच्या आरोपांवरून घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे ही संस्था सील करण्यात आली असून त्याविरोधात शेतकरी आणि ग्राहक आक्रमक झाले आहेत.

कारवाईनंतर गेल्या आठ दिवसांपासून गोरस भंडारचे दूध संकलन, उत्पादन आणि विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे सुमारे 600 दूध उत्पादक शेतकरी आणि 5000 हून अधिक ग्राहक थेट अडचणीत सापडले आहेत. दररोज सुमारे 9 हजार लिटर दूध खरेदी करणारी ही यंत्रणा बंद पडल्याने शेतकऱ्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत थांबला आहे.

शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की, कारवाईमुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत असून दूध संकलन बंद झाल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. तर ग्राहकांकडूनही नियमित आणि शुद्ध दूध मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्राहकांनी एकत्र येत निषेध नोंदवत मूक मोर्चा काढला होता.

मात्र, मोर्च्यानंतरही प्रश्न सुटला नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याची तयारी सुरू झाली आहे. संबंधित प्रकरण थेट मंत्रालयापर्यंत नेण्याचा निर्धार शेतकरी आणि ग्राहकांनी व्यक्त केला आहे. तसेच सामूहिक पत्राद्वारे FDA आयुक्तांकडे दाद मागण्याची तयारीही सुरू आहे.

FDA ने गोरस भंडारमध्ये दुग्धजन्य पदार्थ असुरक्षित वातावरणात तयार होत असल्याचा ठपका ठेवत कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान सुमारे 25 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून संपूर्ण उत्पादन व विक्री प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.

गोरस भंडार ही सहकारी तत्त्वावर चालणारी संस्था असून वर्धा परिसरात शेकडो गोपालक, वितरक आणि कर्मचारी यावर अवलंबून आहेत. त्यामुळे या कारवाईचा परिणाम केवळ संस्थेपुरता मर्यादित न राहता शेतकरी, ग्राहक आणि रोजगार यांच्यावरही मोठ्या प्रमाणात झाला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे वर्ध्यात सामाजिक-आर्थिक तणाव निर्माण झाला असून पुढील काही दिवसांत हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!