Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी दुर्घटना..! एसटी, कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू, महाराष्ट्रावर शोककळा

मोठी दुर्घटना..! एसटी, कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू, महाराष्ट्रावर शोककळा

Jalgaon Accident : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे मार्गावर सोमवारी सकाळी भीषण तिहेरी अपघात झाला. एसटी बस, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळ गावाजवळील हॉटेल वृंदावन परिसरात सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अमळनेरहून धुळ्याकडे जाणारी एसटी बस, कार आणि दुचाकी प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या गुजरात पासिंग कारने नियंत्रण गमावून या वाहनांना जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच कारमधील महिला आणि पुरुषांसह एकूण ६ जणांनी जागीच प्राण गमावले. अपघातात काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. कारमध्ये अडकलेल्या एका लहान मुलाला स्थानिक नागरिक, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने उपचारासाठी गुजरातमधील व्यारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासह मदतकार्य हाती घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

या भीषण अपघातामुळे अमळनेर-धुळे मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!