Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट! लक्ष्मण हाकेंचा पवार कुटुंबाला आव्हान; म्हणाले, ‘सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर पाठवा’

बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट! लक्ष्मण हाकेंचा पवार कुटुंबाला आव्हान; म्हणाले, ‘सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर पाठवा’

Baramati Bypoll: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. “आम्ही ही निवडणूक लढवून आणि जिंकून दाखवू,” असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी थेट पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे. हाके यांच्या या भूमिकेमुळे बारामतीची निवडणूक आता अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत असून, राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सुनेत्रा वहिनींबाबत लक्ष्मण हाकेंचा नवा प्रस्ताव
लक्ष्मण हाके यांनी बारामतीची जागा बिनविरोध करण्यास स्पष्ट विरोध दर्शवला असून एक वेगळा प्रस्ताव मांडला आहे. “सुनेत्रा पवार यांना सरकारने विधानपरिषदेवर पाठवावे. ज्याप्रमाणे शरद पवार यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवले, तसेच सुनेत्रा वहिनींनाही पाठवता येईल,” असे विधान हाके यांनी केले आहे. अजित पवार यांच्या कुटुंबातील सदस्याऐवजी दुसऱ्या कुण्या सामान्य स्थानिक कार्यकर्त्याला संधी मिळावी, असा त्यांचा आग्रह आहे. “मी स्वतः किंवा येथील एखादा स्थानिक उमेदवार निवडणूक लढवेल. निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यावर काहींच्या पोटात का दुखते?” असा बोचरा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

२३ एप्रिलला मतदान; दु:खाच्या भांडवलावरून टीका
अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली असून येत्या 23 एप्रिल रोजी येथे मतदान होणार आहे. या भावनिक वातावरणात हाकेंनी सरकारवरही बोचरी टीका केली आहे. “दादांच्या निधनानंतर केवळ तीन दिवसांत जर मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो, तर आम्हीच दु:खाचे भांडवल का करायचे? आम्ही शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढू,” असे हाके यांनी ठणकावून सांगितले. या विधानामुळे बारामतीमध्ये आता पवार विरुद्ध हाके असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

राजकीय पेच आणि प्रस्थापितांसमोरील आव्हान
बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र लक्ष्मण हाके यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्राने प्रस्थापितांसमोर आव्हान उभे केले आहे. निवडणुकीची अधिसूचना निघाल्यापासून बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू होते, पण हाके यांनी त्याला छेद दिला आहे. आता या पोटनिवडणुकीत नेमके कोणकोणते उमेदवार रिंगणात उतरतात आणि बारामतीकर कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांच्याही रणनीतीवर या भूमिकेचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!