Narayan Rane: माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांची प्रकृती ठिक नसल्याचे समोर आले आहे. घरगुती वाद आणि निवडणूकीच्या धावपळीत नारायण राणे यांना आज एका कार्यकर्मात भोवळ आली. सिुंदुधुर्गमधील चिपळून येथे कृषी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तेथे भाषण देताना त्यांना अचानक चक्कर आल्या सारखे वाटले. त्यांनी तात्काळ भाषण आटोपत घेत कार्यक्रमातून काढता पाय घेतला. नारायण राणे आपल्या पत्नीसह विश्रामगृहाकडे परतले.
नारायण राणे यांनी कालच एका भाषणादरम्यान, राजकीय निवृत्तीचे संकेत दिले अन् आज त्यांची प्रकृती खालवली. भाषणादरम्यान अखेरच्या टप्प्यात त्यांचा आवाजही बसल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी यांनी भाषण आटोपतं घेतलं. नारायण राणे यांना भोवळ आल्याने सर्वांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे, चक्कर आल्यासारखे वाटत असल्याने माध्यमांशी बोलण्याची राणेंनी नकार दिला. तर, या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नारायण राणे थेट गेस्ट हाऊसकडे रवाना झाले. नारायण राणे आपल्या पत्नीसह विश्रामगृहाकडे परतले, यावेळी, मोठा बंदोबस्त त्यांच्यासमवेत होता. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची काळजी घेतली.
दरम्यान, सिंधुदुर्गातल्या सभेत बोलताना नारायण राणे म्हणाले की, “आजही नारायण राणे रस्त्यावर भाजी घेतो. हातात अंगठ्या घालून, काळ्या काचेच्या गाड्या घेऊन काही जण येतात… पण माझ्या गाडीला काळ्या काचा नाहीत. माणुसकी हा माझा धर्म आहे. बऱ्याच जणांनी माझ्या आड येण्याचं काम केलं, त्यावर मी आज बोलणार नाही. तेव्हाही मला अडचणी आल्या, आतांही आल्या. राजकारणात कट कारस्थान केलं जातंय. त्यामुळे, आता मी ठरवलंय, घरी बसायचं. मुलांना सांगेन नांदा सौख्य भरे… चांगल्याला जोपासा.” असे त्यांनी म्हटले होते.


