Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सिंधुदुर्गात ACB ची मोठी कारवाई! जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक लाच घेताना रंगेहात अटकेत

सिंधुदुर्गात ACB ची मोठी कारवाई! जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक लाच घेताना रंगेहात अटकेत

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभागात भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय बिल मंजुरीसाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने वैद्यकीय उपचारांचे बिल मंजुरीसाठी जिल्हा रुग्णालयात सादर केले होते. मात्र फाईलमध्ये त्रुटी असल्याचे सांगत ती पूर्ण करून देण्यासाठी महादेव तेली यांनी बिलाच्या रकमेच्या ३ टक्के लाच मागितली होती. सुरुवातीला ही रक्कम सुमारे १८ हजार रुपये होती. नंतर चर्चेनंतर १० हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरल्याचे समोर आले.

या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने कुडाळ येथील ACB कडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने जिल्हा रुग्णालयात सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना महादेव तेली यांना रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!