Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बीडच्या विलास घुले हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण; पीडित महिलेचे गंभीर आरोप

बीडच्या विलास घुले हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण; पीडित महिलेचे गंभीर आरोप

बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्याप्रकरणात नवे आणि गंभीर आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचे नाव तक्रारीत आल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. विशेष तपास पथकाने (SIT) सौरभ सोनवणे यांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील एका पीडित महिलेने गंभीर आरोप करत, विलास घुले आणि त्याचा मित्र उमेश माने यांच्याकडून वारंवार त्रास, धमक्या आणि ब्लॅकमेल केल्याचा दावा केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, उमेश मानेने तिच्यासोबत बळजबरी करून त्याचे व्हिडिओ तयार केले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत तिचा छळ केला.

पीडित महिलेने असा आरोप केला आहे की, तिने ही बाब कुटुंबीयांना सांगितल्यानंतर पोलिसांकडे जाण्याची तयारी केली होती. मात्र, रमेश घुले यांनी धमकी देत तक्रार न करण्यास भाग पाडल्याचा दावा तिने केला आहे. तसेच, तक्रार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आल्याचेही तिने सांगितले.

महिलेच्या आरोपांनुसार, ती आणि तिचे कुटुंब गाव सोडून दुसरीकडे राहायला गेले तरीही विलास घुले आणि उमेश माने त्यांना वारंवार त्रास देत होते. ३ जून रोजी विलास घुले यांनी संबंध ठेवण्यास नकार दिल्यास तिच्या पती आणि मुलांना मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही महिलेने केला आहे.

याशिवाय, २० जून रोजी विलास घुले आणि उमेश माने पुन्हा तिच्या घरासमोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावेळी शिवीगाळ आणि धमकावण्याचा प्रकार झाल्यानंतर कुटुंबीय त्यांना समजावण्यासाठी गेले असता वाद निर्माण झाला. या वादादरम्यान काचेच्या बाटल्या आणि विटांनी मारहाण करण्यात आल्याने परिस्थिती चिघळल्याचा आरोप महिलेने केला आहे.

पीडित महिलेने पोलिसांनी आपली तक्रार अद्याप नोंदवून घेतली नसल्याचा आरोप करत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील काही व्हिडिओ आणि दाव्यांमुळे प्रकरण अधिकच गाजू लागले असून, पोलिसांकडून सर्व आरोपांची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!