Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बापाची सावली होण्याचं स्वप्न अधुरं; शेतात काम करताना वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बापाची सावली होण्याचं स्वप्न अधुरं; शेतात काम करताना वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील घेडेगाव परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शेतात वडिलांना मदत करत असताना अंगावर वीज कोसळून २२ वर्षीय तरुण अभिषेक रूपचंद दरेकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलांच्या डोळ्यादेखत मुलाने तडफडत प्राण सोडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अभिषेक हा कोल्हापूर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. सुट्टीसाठी तो गावी आला होता आणि वडिलांसोबत शेतातील कामात मदत करत होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि मोठा अधिकारी व्हावे, हे त्याचे स्वप्न होते.

सोमवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास हवामान अचानक बदलले. आभाळ भरून आले, जोरदार वारे सुरू झाले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता निर्माण झाली. त्याच दरम्यान शेतात काम करत असताना अभिषेकच्या अंगावर अचानक वीज कोसळली.

वीज कोसळताच तो गंभीररीत्या जखमी होऊन जमिनीवर कोसळला. वडील रूपचंद दरेकर यांनी डोळ्यादेखत मुलाला अशा अवस्थेत पाहून हंबरडा फोडला. स्थानिकांच्या मदतीने त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून दरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकीकडे कुटुंबाला आधार देण्याचं स्वप्न पाहणारा तरुण, दुसरीकडे नियतीच्या या क्रूर घटनेमुळे कुटुंबाचा आधार हरपला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!