Today मंगळवार, 30th जून 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बीडमध्ये थरारक हत्याकांड! सासुरवाडीत राहणाऱ्या जावयाची धारदार शस्त्राने हत्या; जुन्या वादाचा संशय

बीडमध्ये थरारक हत्याकांड! सासुरवाडीत राहणाऱ्या जावयाची धारदार शस्त्राने हत्या; जुन्या वादाचा संशय

Beed Crime : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे. सासुरवाडीत राहणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माजलगाव तालुक्यातील तालखेड गावाजवळ सोमवारी सकाळी रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने या घटनेची माहिती उघडकीस आली.

मृत तरुणाचे नाव विकास दत्तात्रय वाघमोडे (वय ३३, रा. किट्टी आडगाव) असे असून, त्याच्या गळ्यावर, पोटावर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास वाघमोडे यांनी काही वर्षांपूर्वी तालखेड येथील एका तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. सासू-सासऱ्यांच्या निधनानंतर ते गेल्या पाच वर्षांपासून सासरी राहून शेतीची जबाबदारी सांभाळत होते.

रविवारी सकाळी विकास हे नेहमीप्रमाणे शेतात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यानंतर पत्नी आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. सोमवारी सकाळी तालखेडजवळील खंडोबा वाडी परिसरात त्यांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहावरील गंभीर जखमा पाहता धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

या हत्येमागे जुन्या वादाचे कारण असल्याची चर्चा परिसरात सुरू असली, तरी पोलिसांनी अद्याप कोणत्याही कारणाला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

या थरारक घटनेमुळे तालखेड आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, उशिरापर्यंत या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!