Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ठाकरे बंधूंना सिंधुदुर्गात मोठा धक्का; युवा नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

ठाकरे बंधूंना सिंधुदुर्गात मोठा धक्का; युवा नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Sindhudurg Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरही महाराष्ट्रातील राजकीय हालचाली थांबलेल्या नाहीत. सिंधुदुर्गात आता मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मनसे विद्यार्थी सेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी नारकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

सिंधुदुर्गातील मांगवली गावात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मांगवली हे गाव भाजपचा बालेकिल्ला मानले जाते. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झालेल्या या गावात आता ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने भाजपची ताकद आणखी वाढल्याचे बोलले जात आहे.

यावेळी भाजप पदाधिकारी राजेंद्र राणे, माजी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे आणि खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन महेश संसारे उपस्थित होते. ठाकरे गटाचे शाखाप्रमुख सचिन आयरे, माजी शाखाप्रमुख मधुकर आयरे, युवा शाखाप्रमुख प्रवीण राणे, बूथ अध्यक्ष अंकुश गुरव, संतोष गुरव आणि साहिल गुरव यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

तसेच सिद्धी नारकर यांच्यासोबत संतोष नारकर, समीक्षा नारकर, साई नारकर, विलास नारकर, विघ्नेश नारकर, विजय नारकर, वैशाली नारकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पक्षबदलाचा मोठा निर्णय घेतला. या प्रवेशामुळे सिंधुदुर्गातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!