Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mumbai Hyderabad Bullet Train: आता मुंबईवरून पुणे अवघ्या 50 मिनिटांत! मुंबई-हैदराबाद हायस्पीड मार्गाचा आराखडा तयार; सोलापूर-पंढरपूरला लॉटरी

Mumbai Hyderabad Bullet Train: आता मुंबईवरून पुणे अवघ्या 50 मिनिटांत! मुंबई-हैदराबाद हायस्पीड मार्गाचा आराखडा तयार; सोलापूर-पंढरपूरला लॉटरी

Mumbai Hyderabad Bullet Train: मुंबई आणि हैदराबाद या दोन महानगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाने आता वेग घेतला असून, या हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्राथमिक आराखडा ‘रेल्वे ॲटलास’मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्थेत क्रांती होणार असून विशेषतः सोलापूर आणि पंढरपूर या जिल्ह्यांच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.

नव्या नियोजनानुसार, हा मार्ग मुंबईहून पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर आणि कलबुर्गीमार्गे थेट हैदराबादला जोडला जाईल. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी दिलेल्या संकेतांवर आता शिक्कामोर्तब झाले असून, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या धर्तीवरच या विशाल कॉरिडॉरची उभारणी केली जाणार आहे.

या हायस्पीड तंत्रज्ञानामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार असून मुंबई ते पुणे हे अंतर अवघ्या 48 ते 50 मिनिटांत पार करणे शक्य होईल. तसेच, पुणे ते सोलापूर प्रवासासाठी केवळ 45 ते 55 मिनिटे लागतील, तर मुंबईहून सोलापूरला पोहचण्यासाठी केवळ दीड तासाचा अवधी लागेल. पुणे ते हैदराबाद हे सुमारे 500 किलोमीटरहून अधिकचे अंतर दोन तासांपेक्षा कमी वेळात कापले जाणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचण्यासोबतच व्यापारवृद्धीलाही मोठी मदत होणार आहे.

या प्रकल्पामुळे पंढरपूरच्या धार्मिक पर्यटनाला एक नवीन आयाम मिळणार आहे. देशभरातील वारकरी आणि भाविकांसाठी विठ्ठलाचे दर्शन घेणे अधिक सुलभ आणि जलद होईल. दुसरीकडे, सोलापूरच्या वस्त्रोद्योग आणि औद्योगिक क्षेत्राला मुंबई-हैदराबाद सारख्या मोठ्या बाजारपेठांची थेट जोडणी मिळाल्याने व्यापारात मोठी वाढ होईल. सोलापूरजवळ बुलेट ट्रेनसाठी स्वतंत्र स्टेशन उभारण्याचे नियोजन असून, यामुळे परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास होऊन रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होतील. एकूणच, दक्षिण महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी हा बुलेट ट्रेन प्रकल्प एक ‘गेमचेंजर’ ठरणार असून राज्याच्या विकास नकाशावर सोलापूर आणि पंढरपूरचे स्थान अधिक मजबूत होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!