Today बुधवार, 16th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Monsoon 2026: ‘या’ तारखेला होणार मान्सूनचं आगमन; IMD ने जाहीर केली तारीख

Monsoon 2026: ‘या’ तारखेला होणार मान्सूनचं आगमन; IMD ने जाहीर केली तारीख

Monsoon 2026: देशभरात सूर्याचा प्रकोप वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. यंदा नैऋत्य मान्सून आपल्या नियोजित वेळेच्या पाच दिवस आधीच भारतात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. ताज्या अंदाजानुसार, 26 मे पर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकेल, ज्यामुळे देशातील अधिकृत पर्जन्यमानाला सुरुवात होईल.

पाच दिवस आधीच बरसणार वरुणराजा
साधारणपणे मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची प्रमाणित तारीख 1 जून असते. मात्र, यंदाची हवामानाची स्थिती पाहता मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू आहे. या अंदाजात 4 दिवसांची तफावत गृहीत धरण्यात आली आहे (म्हणजेच मान्सून २२ ते ३० मे दरम्यान कधीही येऊ शकतो). गेल्या वर्षी मान्सूनचे आगमन 24 May रोजी झाले होते. केरळमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर साधारणपणे काही दिवसांतच तो उर्वरित भारत व्यापण्यास सुरुवात करतो.

बळीराजाला दिलासा, उष्णतेची लाट ओसरणार
मान्सूनचे लवकर आगमन हे केवळ उन्हाळ्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठीच नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही शुभसंकेत आहेत.

  • शेतीसाठी पूरक: वेळेपूर्वी पाऊस सुरू झाल्याने खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला गती मिळेल.
  • पाणीसाठा वाढणार: देशातील प्रमुख धरणांमधील खालावलेली पाणी पातळी सुधारण्यास मदत होईल.
  • उष्णतेपासून मुक्ती: उत्तर आणि मध्य भारतासह महाराष्ट्रात जाणवणारी उष्णतेची लाट ओसरण्यास यामुळे मदत होणार आहे.

हवामान विभाग सध्या मान्सूनच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असून, पुढील काही दिवसांत मान्सूनच्या प्रवासाचा पुढील मार्ग स्पष्ट होईल. मान्सूनच्या या लवकर आगमनामुळे पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्याची आशा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!