Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नाशिकमध्ये महायुतीला जबर धक्का! बंडखोर गोकुळ गितेंचा दणदणीत विजय; पहिल्याच फेरीत नरेंद्र दराडेंचा पराभव

नाशिकमध्ये महायुतीला जबर धक्का! बंडखोर गोकुळ गितेंचा दणदणीत विजय; पहिल्याच फेरीत नरेंद्र दराडेंचा पराभव

नाशिक : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना धक्का देत भाजपमधून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्याच फेरीत आवश्यक कोटा पूर्ण करत गितेंनी विजय जवळपास निश्चित केला असून नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार

मतमोजणी सुरू होताच गोकुळ गिते यांनी आघाडी घेतली. पहिल्या फेरीतील मतमोजणीतच त्यांनी विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा ओलांडल्याची माहिती समोर आली. समर्थकांच्या दाव्यानुसार गितेंना तब्बल 389 मते मिळाली. निकाल स्पष्ट होताच मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांनी जल्लोष सुरू केला.

दुसरीकडे, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी पराभव स्वीकारत मतमोजणी केंद्र सोडल्याची चर्चा आहे. अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच हा निकाल राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

मतमोजणी केंद्रात तणाव

निकालापूर्वी मतमोजणी केंद्रात मोठा गोंधळ उडाला होता. गोकुळ गिते यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाच्या नियमांचा मुद्दा उपस्थित केला. यावरून दोन्ही गटांचे समर्थक आमनेसामने आले आणि जोरदार शाब्दिक चकमक झाली.

परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत सुनावणी घेतली आणि पोलिस बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया सुरू ठेवली.

छुप्या मतदानाचा फटका?

नाशिकमध्ये संख्याबळ महायुतीच्या बाजूने असतानाही गोकुळ गितेंना मिळालेल्या मोठ्या पाठिंब्यामुळे ‘क्रॉस व्होटिंग’ किंवा छुप्या मतदानाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील काही मतदारांनी अधिकृत उमेदवाराऐवजी गितेंना पसंती दिल्याचे निकालातून स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.

राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

गोकुळ गिते यांच्या विजयामुळे नाशिकमधील भाजप आणि महायुतीच्या अंतर्गत गटबाजीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विधान परिषद निवडणुकीतील हा निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा राजकारणावरही परिणाम करणारा ठरू शकतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!