Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

संभाजीनगरात खळबळ! दुबईत नोकरीचे आमिष, शिक्षिकेचे धर्मांतर करून अत्याचार; पैसे-दागिने घेऊन आरोपी फरार

संभाजीनगरात खळबळ! दुबईत नोकरीचे आमिष, शिक्षिकेचे धर्मांतर करून अत्याचार; पैसे-दागिने घेऊन आरोपी फरार

Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ४३ वर्षीय विवाहित शिक्षिकेच्या तक्रारीवरून धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक, अत्याचार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप एका खासगी शाळेतील शिक्षकावर करण्यात आला आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि आरोपी एकाच खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ओळखीतून निर्माण झालेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने दुबईमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्याशी जवळीक वाढवत लग्नाचे आणि एकत्र राहण्याचे आश्वासन दिले. तसेच विविध कारणे सांगून तिला शहरातील हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, परदेशातील नोकरीसाठी धर्मांतर आवश्यक असल्याचे सांगून तिच्यावर दबाव टाकण्यात आला. धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यास आणि विशिष्ट धार्मिक प्रक्रिया करण्यास भाग पाडल्याचा आरोपही महिलेने केला आहे.

याशिवाय, पासपोर्ट, व्हिसा आणि नोकरी प्रक्रियेच्या नावाखाली आरोपीने ऑनलाइन व्यवहार, रोख रक्कम आणि सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने घेतल्याचा आरोप आहे. मात्र, पैसे आणि दागिने मिळाल्यानंतर आरोपीने संपर्क तोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून न्यायालयीन आणि तपास प्रक्रियेनंतरच सर्व आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!