Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्यातील ७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबई, पुणे, अमरावतीसह अनेक ठिकाणी फेरबदल

राज्यातील ७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबई, पुणे, अमरावतीसह अनेक ठिकाणी फेरबदल

IPS Transfer : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलीस सेवेतील सात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ च्या शिफारशींनुसार हा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम २२-न अंतर्गत आदेश लागू करण्यात आला आहे.

या फेरबदलात मुंबई, पुणे, अमरावती आणि मीरा-भाईंदर वसई-विरार परिसरातील महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामुळे पोलीस प्रशासनात मोठ्या हालचालींना वेग आला आहे.

प्रमुख बदल्यांमध्ये मुंबईच्या दक्षिण विभागाचे पोलीस उपआयुक्त दिनेश बारी यांची पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागपूर येथील अँटी नक्षल टास्क फोर्समध्ये कार्यरत असलेले यशवंत सोळंके यांची अमरावती शहरातील परिमंडळ-१ चे पोलीस उपआयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले संदीप जाधव यांना राज्य पोलीस नियंत्रण कक्षाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे. तर शशिकांत बोराटे यांची मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महिला अधिकाऱ्यांनाही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. स्मिता पाटील यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सागरी सुरक्षा विभागात उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, मितेश घट्टे यांची यापूर्वी झालेली बदली रद्द करून त्यांना मुंबई शहरात पोलीस उपआयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच वैशाली माने यांची बदलीही रद्द करण्यात आली असून त्यांना सध्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पुढील पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहेत.

याशिवाय अमरावती पोलीस आयुक्तालयातही मोठे फेरबदल करण्यात आले असून २२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेचे विभाजन करून विविध अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्याने स्थानिक पोलीस प्रशासनात मोठी हालचाल निर्माण झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!