Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vijay Kumbhar On Ajit Pawar: पवार कुटुंबाने पुण्यात साखर संस्थेची जमीन लाटली; विजय कुंभार यांचा नवा गौप्यस्फोट

Vijay Kumbhar On Ajit Pawar: पवार कुटुंबाने पुण्यात साखर संस्थेची जमीन लाटली; विजय कुंभार यांचा नवा गौप्यस्फोट

Vijay Kumbhar On Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात सध्या पुण्याच्या शिवाजीनगर भागातील एका मौल्यवान भूखंडावरून नवा वाद पेटला आहे. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर ‘डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन’च्या जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ज्या इमारतीत नुकतीच राष्ट्रवादीची पत्रकार परिषद झाली, तीच इमारत संशयाच्या फेऱ्यात असल्याचा दावा कुंभार यांनी केला आहे.

भाडेकराराच्या नावाखाली विक्रीचा डाव?

विजय कुंभार यांनी म्हटलं आहे की, १९३६ मध्ये स्थापन झालेली ही संस्था साखर उद्योगातील संशोधनाचे केंद्र आहे. मेट्रो स्टेशनजवळ संस्थेची मोकळी जागा होती. संस्थेच्या आर्थिक अडचणींचे कारण देत धर्मादाय आयुक्तांकडून १५ हजार स्क्वेअर फूट जागा ६० वर्षांच्या भाडेकरारावर (Lease) देण्याची परवानगी घेण्यात आली होती. कुंभार यांच्या मते, कागदोपत्री भाडेकरार असला तरी प्रत्यक्षात जमिनीची विक्री करण्यात आली. या ठिकाणी आता १३ मजली व्यापारी इमारत उभी राहिली असून, सुमारे ६३ हजार स्क्वेअर फूट बांधकाम झाले आहे.

साहिल प्रधान आणि ‘पवार’ कनेक्शन

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे साहिल प्रधान. विजय कुंभार यांनी दावा केला की, या व्यवहाराची ‘पॉवर ऑफ अटर्नी’ साहिल प्रधान याला देण्यात आली होती. हा तोच व्यक्ती आहे ज्याचे नाव यापूर्वी मुंढवा जमीन घोटाळ्यात आणि पार्थ पवार यांच्याशी संबंधित ‘अमेडिया’ कंपनीच्या व्यवहारात समोर आले होते. तसेच, ‘कल्पवृक्ष प्लांटेशन’ कंपनीचे संचालक आणि सुनेत्रा पवार यांचे व्यावसायिक संबंध असल्याचा संशयही कुंभार यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास शरद पवार आणि अजित पवार समाधानी होतील; निलेश लंके नेमकं काय म्हणाले?

सत्तेतील संगनमताचा आरोप

विजय कुंभार यांनी केवळ राष्ट्रवादीवरच नाही, तर भाजपवरही निशाणा साधला आहे. २०१७ पासून या व्यवहाराबाबत संशयास्पद हालचाली सुरू होत्या, तरीही आजवर कोणतीही कारवाई का झाली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्या अजित पवार सत्तेत एकत्र असल्यानेच या प्रकरणावर पांघरूण घातले जात आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.

ऐतिहासिक संस्थेची डागाळलेली प्रतिमा

ज्या संस्थेची मुहूर्तमेढ वालचंद हिराचंद यांनी रोवली आणि ज्या इमारतींचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांच्यासारख्या दिग्गजांच्या हस्ते झाले, ती संस्था आज जमिनीच्या वादामुळे चर्चेत आली आहे. हा केवळ जमिनीचा व्यवहार नसून, सत्तेचा गैरवापर आणि संस्थात्मक विश्वासघाताचा मोठा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!