Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ladki Bahin Yojana : सरकारला गंडवण्याचा प्रयत्न की तांत्रिक घोळ? 710 पुरुषांनी भरले लाडकी बहीण योजनेचे फॉर्म

Ladki Bahin Yojana : सरकारला गंडवण्याचा प्रयत्न की तांत्रिक घोळ? 710 पुरुषांनी भरले लाडकी बहीण योजनेचे फॉर्म

Ladki Bahin Yojana: केवळ महिलांसाठी असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत पुरुष अर्जदारांनी घुसखोरी केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार जिल्ह्यात उघड झाली आहे. तब्बल ७१० पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली होती. मात्र, प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे आणि तांत्रिक पडताळणीमुळे हा प्रकार उघडकीस आला असून, हे सर्व संशयास्पद अर्ज प्रशासनाने तातडीने फेटाळून लावले आहेत.

तांत्रिक चुकीमुळे पितळ उघडे: ‘पुरुष’ पर्याय निवडल्याने फजिती
या ७१० अर्जांच्या छाननी दरम्यान एक गंभीर बाब समोर आली. अर्ज भरताना ‘लिंग’ (Gender) या रकान्यात महिला निवडण्याऐवजी अर्जदारांनी ‘पुरुष’ हा पर्याय निवडला होता. ही चूक जाणीवपूर्वक केली गेली की अनावधानाने झाली, याचा तपास सध्या सुरू आहे. मात्र, या एका तांत्रिक चुकीमुळे संबंधित अर्जदारांचे बिंग फुटले आणि त्यांचे अर्ज तत्काळ कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आले.

ई-केवायसी (E-KYC):
सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचे प्रयत्न ‘ई-केवायसी’च्या फिल्टरमुळे पूर्णपणे फसले आहेत. आधार कार्डवरील लिंग आणि अर्जात दिलेली माहिती यामध्ये तफावत आढळल्याने सिस्टमने हे अर्ज आपोआप नाकारले. पडताळणीच्या पहिल्याच टप्प्यात ही चूक पकडली गेल्याने एकाही पुरुषाला योजनेचे पैसे मिळू शकले नाहीत, ज्यामुळे सरकारी निधीचा होणारा मोठा अपव्यय वेळेत रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.

प्रशासनाचा ‘मायक्रो वॉच’ आणि ई-केवायसीची प्रक्रिया
या प्रकरणानंतर महिला व बालकल्याण विभागाने अधिक कडक पवित्रा घेतला असून नंदुरबार जिल्हा प्रशासनाने आता प्रत्येक अर्जाची ‘मायक्रो’ लेव्हलवर तपासणी सुरू केली आहे. केवळ पात्र आणि गरजू महिलांनाच लाभ मिळावा, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. पात्र महिलांनी आपला अर्ज सुरक्षित ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • अधिकृत पोर्टल: सर्वप्रथम ladakibahin.maharashtra.gov.in वर लॉगिन करा.
  • केवायसी टॅब: होमपेजवरील ‘ई-केवायसी’ या बटणावर क्लिक करा.
  • आधार प्रमाणीकरण: तुमचा आधार नंबर टाकून कॅप्चा कोड भरा.
  • ओटीपी व्हेरिफिकेशन: मोबाईलवर प्राप्त झालेला OTP टाकून माहिती सबमिट करा.
Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!