Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Traffic Jam : पुणे-मुंबईनंतर आता ‘या’ हायवेवर कोंडी; किनी टोलनाक्याजवळ कांद्याचा ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प

Traffic Jam : पुणे-मुंबईनंतर आता ‘या’ हायवेवर कोंडी; किनी  टोलनाक्याजवळ कांद्याचा ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प

Traffic Jam : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक 33 तासांनंतर जेमतेम पूर्वपदावर येत असतानाच, आता पुणे-बेंगळुरू महामार्गावर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथील ओढ्याच्या पुलावर कांद्याने भरलेला ट्रक उलटल्याने कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

नेमकं काय घडलं?
पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा कांद्याचा ट्रक आज सकाळी घुणकी येथील पुलाजवळ पलटी झाला. या अपघातामुळे ट्रकमधील कांदा महामार्गावर सर्वत्र विखुरला गेल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला. परिणामी, किनी टोलनाका ते कराड दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

हेही वाचा – Mumbai Pune Expressway: वाहतूक कोंडीमुळे लोकांचा संताप; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोल न आकारण्याच्या सूचना देण्याचे राज्यमंत्र्यांचे आश्वासन

अपघाताचे मुख्य कारण: ‘सिक्स लेनिंग’चे काम
या भागात सध्या कागल ते सातारा महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे घुणकी येथील ओढ्यावरील एका पुलाची वाहतूक बंद ठेवून दुसऱ्या पुलावरून दुहेरी वाहतूक वळवण्यात आली आहे.nपुलावर अचानक वळावे लागत असल्याने चालकांचा वाहनावरील ताबा सुटतो. यापूर्वीही या अरुंद वळणावर अनेक अपघात झाले असून काहींना प्राण गमवावे लागले आहेत.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करण्याचे आणि रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांनी किनी टोलनाक्याजवळ होणारी कोंडी लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!