Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

KDMC News : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नवनिर्वाचित नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

KDMC News : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नवनिर्वाचित नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

KDMC News : महापालिका निवडणुकीनंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मधुर म्हात्रे यांनी धनुष्यबाण चिन्ह स्वीकारले. यावेळी आमदार राजेश मोरे हेही उपस्थित होते.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाने ११ नगरसेवक निवडून आणले होते. मात्र, मतमोजणीनंतर मधुर म्हात्रे यांच्यासह आणखी दोन नगरसेवक पक्ष संपर्कात आले नव्हते. गेल्या २८ दिवसांपासून ते संपर्काबाहेर राहिले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने त्यांना पक्ष प्रक्रियेतून दूर राहिल्याबद्दल नोटीस बजावली आणि पक्ष आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हकालपट्टी केली होती.

शुक्रवारी (१४ मार्च) हे तिन्ही नगरसेवक कोकण भवन येथे हजर राहून सदस्य नोंदणी केली, पण पक्षाने आधीच कारवाई केल्याने त्यांची सदस्यता संपुष्टात आली होती. आता मधुर म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश करून ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे.

ठाकरे गटासाठी मोठा फटका

ठाकरे गटाची ही हकालपट्टी आणि त्यानंतरचा शिंदे गटातील प्रवेश हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. KDMC मध्ये ठाकरे गटाची ताकद आता आणखी कमी होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने मात्र हे नवे नगरसेवक आपल्या ताकदीत सामील करून घेतले असून, महापालिकेतील संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या घटनेमुळे कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शिंदे गटाने म्हात्रे यांचे स्वागत करताना “शिवसेनेच्या मूळ विचारसरणीला बळकटी” असा दावा केला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या राजकारणात आता नवे वळण घडणार असून, पुढील काही दिवसांत आणखी काही नगरसेवकांच्या प्रवेशाची शक्यता वर्तवली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!