मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी नेमलेल्या सरकारी समितीच्या अध्यक्षपदाचा माजी राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. जानेवारी २०२५ पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी हा राजीनाम्याचा निर्णय घेतला.
मत्स्य व्यवसाय संदर्भातील प्रदीर्घ अनुभव व समितीपुढे आलेल्या सूचनामुळे मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देणे, ही काळाची गरज असल्याचे नाईक यांचे मत होते.


