Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nashik district president : अजितदादांच्या विश्वासू जिल्हाध्यक्षांचं अल्पशा आजाराने निधन; राष्ट्रवादीवर शोककळा

Nashik district president : अजितदादांच्या विश्वासू जिल्हाध्यक्षांचं अल्पशा आजाराने निधन; राष्ट्रवादीवर शोककळा

NCP Nashik district president : नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पांडुरंग पगारे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मंगळवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे ऐन जिल्हा परिषद निवडणुकांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शोककळा पसरली असून संघटनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

२०१२ पासून नाशिक जिल्हाध्यक्ष

अ‍ॅड. रवींद्र पगारे हे २०१२ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. उत्तर महाराष्ट्रात ते अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

शरद पवार ते अजित पवारांपर्यंतचा राजकीय प्रवास

पगारे यांची ओळख ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय म्हणून होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. १९९९ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून ते पक्षाशी निष्ठावान राहिले.

४० वर्षांचा संघटनात्मक अनुभव

अ‍ॅड. रवींद्र पगारे यांना सुमारे ४० वर्षांचा संघटनात्मक अनुभव होता. त्यांनी नाशिक महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे उपसभापती, युवक काँग्रेस व एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, तसेच विविध जिल्ह्यांचे पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.

शरद पवारांच्या समर्थनार्थ पहिला मेळावा

१९९९ मध्ये शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर, नाशिकमधील मामा मुंगी मंगल कार्यालयात शरद पवारांच्या समर्थनार्थ राज्यातील पहिला मेळावा घेणारे नेते म्हणून रवींद्र पगारे यांची ओळख होती.

आज होणार अंत्यसंस्कार

अ‍ॅड. रवींद्र पगारे यांच्या पार्थिवावर आज बुधवारी बागलाण तालुक्यातील उत्राणे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनामुळे नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठे संघटनात्मक आव्हान उभे राहिले असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांवर त्याचा काय परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!