Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shankar Anna Dhondge : मराठवाड्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांचा हजारो समर्थकांसह शिंदे गट शिवसेनेत प्रवेश

Shankar Anna Dhondge : मराठवाड्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांचा हजारो समर्थकांसह शिंदे गट शिवसेनेत प्रवेश

Shankar Anna Dhondge: मराठवाड्याच्या राजकारणातील एक मोठे नाव आणि शेतकरी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी अखेर आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. लोहा-कंधारमधील हजारो समर्थकांसह त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील ग्रामीण राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘नंदनवन’वर समर्थकांचा मेळा: काँग्रेसला बसला धक्का
धोंडगे यांना आपल्या गोटात खेचण्यासाठी काँग्रेसकडूनही जोरदार प्रयत्न सुरू होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी पार पडलेल्या सोहळ्यात त्यांनी भगवा ध्वज हाती घेतला. यावेळी त्यांच्यासोबत दत्ता आनंदराव पवार, नीलमताई खेमनर आणि शिवराज धोंडगे यांच्यासह अनेक जिल्हास्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

बळीराजाच्या प्रश्नांसाठी ‘अण्णां’चा अनुभव मोलाचा – एकनाथ शिंदे
शंकर अण्णांचे पक्षात स्वागत करताना एकनाथ शिंदे यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, धोंडगे हे आयुष्यभर जमिनीवर राहून शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते आहेत. त्यांच्या अनुभवामुळे शिवसेनेची शेतकरी आघाडी अधिक भक्कम होईल. राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा बळीराजाचा आहे. पीक विमा, नैसर्गिक आपत्तीतील मदत आणि शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आम्ही हे सिद्ध केले आहे. लवकरच कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर अप्रत्यक्ष टोला लगावला. ते म्हणाले, “शिवसेना हा मालक-नोकरांचा पक्ष नसून सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी उपमुख्यमंत्री असलो तरी स्वतःला एक कार्यकर्ताच मानतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे नेत आहोत.” धोंडगे यांच्या पक्षप्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी मतांवर पकड मिळवण्यासाठी शिवसेनेला आता एक मोठा चेहरा मिळाला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!