Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमानातील ब्लॅकबॉक्सबाबत मोठी माहिती समोर; जळलेला ब्लॅकबॉक्स डेटा रिकव्हरसाठी परदेशात पाठवण्याची शक्यता

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमानातील ब्लॅकबॉक्सबाबत मोठी माहिती समोर; जळलेला ब्लॅकबॉक्स डेटा रिकव्हरसाठी परदेशात पाठवण्याची शक्यता

Ajit Pawar Death: राज्याचे उपदिवंगत अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारी रोजी भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला निघाले होते, अजित पवार यांचं विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असतानाच विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीला धडकलं. विमान जमिनिला धडकल्यानंतर मोठा स्फोट झाला, क्षणात विमानाला भीषण आग लागली. या घटनेमध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. दरम्यान आता या विमानातील ब्लॉकबॉक्सबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी ब्लॅकबॉक्स सापडला होता.

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे. अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅकबॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता या ब्लॅकबॉक्समधील डेटा रिकव्हर करण्यासाठी तो परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे. अधिक चौकशीबाबत सरकार 1-2 दिवसांत महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. हा ब्लॅकबॉक्स जळालेल्या अवस्थेमध्ये सापडल्याने त्यातील डेटा खराब झाला का? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.

28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी घटनास्थळावरून ब्लॅकबॉक्स रिकव्हर केला गेला होता. आता जी माहिती समोर आली आहे, त्या माहितीनुसार हा ब्लॅकबॉक्स काही प्रमाणात जळालेल्या अवस्थेत सापडल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या ब्लॅकबॉक्समधील माहिती रिकव्हर करण्याची गरज आहे, त्यासाठी आता हा ब्लॅकबॉक्स परदेशात पाठवला जाऊ शकतो, केंद्र सरकार याबाबत लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, त्यांनतर हा ब्लॅकबॉक्स परदेशात पाठवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

डेटा रिकव्हरीनंतर त्या ब्लॅकबॉक्समधून कोणती माहिती समोर येते ते पहावं लागणार आहे. दरम्यान काही जणांकडून या अपघाताबाबत शंका उपस्थित करण्यात येत असल्यामुळे या ब्लॅकबॉक्समधील डेटा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. लवकरच डेटा रिकव्ह होण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!