Today बुधवार, 29th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Satara: व्हॅलेंटाईन डेला शिक्षकाकडून विद्यार्थिनीला प्रपोज; वर्गाबाहेर बोलवून हात पकडला, म्हणाला,”रात्री तीन वाजता व्हॉट्सअपवर…”

Satara: व्हॅलेंटाईन डेला शिक्षकाकडून विद्यार्थिनीला प्रपोज; वर्गाबाहेर बोलवून हात पकडला, म्हणाला,”रात्री तीन वाजता व्हॉट्सअपवर…”

Satara: सातारा जिल्ह्यात एका शाळेत शिक्षकानेच विद्यार्थिनीला प्रपोज केल्याची घटना घडली. व्हॅलेटाईंनच्या दिवशी शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गातून बोलावून घेतले. तिचा हात पकडला आणि मी तुझ्या प्रेम करतो असे म्हणत काही गोष्टी विचारल्या. घाबरलेली विद्यार्थिनी तिथून पळून गेली. आईवडिलांना तिने याबद्दल सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला.

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात असलेल्या मलकापूरमध्ये ही घटना घडली आहे. नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रपोज करत विनयभंग केला. या प्रकरणी कराड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत काय केले?

14 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शिक्षकाने वर्गात बसलेल्या विद्यार्थिनीला बाहेर बोलावले. विद्यार्थिनी घाबरतच वर्गाबाहेर गेली. तिच्यासोबत तिच्या तीन मैत्रिणींनाही तिने नेले होते.

विद्यार्थिनी सोबत असलेल्या तिच्या तीन मैत्रिणींना शिक्षकाने वर्गात पाठवलं. त्यानंतर विद्यार्थिनीला थांबवले आणि म्हणाला की, “मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सअपवर ऑनलाईन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो”, असे म्हणत तिचा हात पकडला.

हे ऐकून विद्यार्थिनी घाबरली. तिने हात झटकला आणि पळत वर्गात गेली. त्यानंतर तिने तिच्या मैत्रिणींना ही घटना सांगितली. तिने कुटुंबायांनाही झालेल्या प्रकाराबद्दल सांगितलं. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी कराड पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!