Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या अतिक्रमण हटाव नोटीसा रद्द कराव्यात; भरणे-पाटील यांचे राधाकृष्ण विखे-पाटील यांना साकडे

उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या अतिक्रमण हटाव नोटीसा रद्द कराव्यात; भरणे-पाटील यांचे राधाकृष्ण विखे-पाटील यांना साकडे

इंदापूर : उजनी धरणाच्या इंदापूर तालुक्यातील पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना भिमा उपसा सिंचन विभागामार्फत पाठवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव नोटीसा तात्काळ रद्द कराव्यात, या मागणीचे निवेदन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत भेट घेऊन बुधवारी (दि. 25) दिले.

या भेटीत दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संदर्भात चर्चा केली. उजनी धरणाच्या निर्मितीसाठी इंदापूर, करमाळा, माढा, दौंड, कर्जत तालुक्यातील 81 गावांनी त्याग केलेला आहे. शेतकऱ्यांनी नाममात्र किंमतीमध्ये शासनास मालमत्ता दिली आहे. शेतकऱ्यांनी हा त्याग जनहितासाठी केलेला आहे. या धरणग्रस्तांचे अद्यापी योग्य असे पुनर्वसनही झालेले नाही. अनेक उजनी धरणग्रस्त गावे नागरी सुविधा पासून वंचित आहेत. उजनी धरणासाठी आपली सर्वस्व त्याग करणाऱ्या धरणग्रस्तांवर जलसंपदा विभागामार्फत शासन निर्णय. दि. 17 जून 2019 व शासन निर्णय 8 ऑक्टोंबर 2025 या निर्णयानुसार धरण क्षेत्र नजिकच्या अतिरिक्त जमिनी पी.पी.पी. (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) 49 वर्ष करारावर देण्याचे दिसत आहे. या शासन निर्णयास धरणग्रस्ताचा तीव्र विरोध दिसून येत आहे. शेतकरी पूर्वीपासून आजपर्यंत ज्या जमिनी संपादित आहेत, परंतु धरणाचे पाणी क्षेत्रामध्ये येत नाही. अशा जमिनीमध्ये पाणीपातळी कमी झाल्यानंतर गाळपेरमध्ये जनावरांना चारा पिके घेत असलेल्या जमिनी काढून घेण्यास धरणग्रस्तांचा तीव्र विरोध आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वीचा शासन निर्णय महसूल व वनविभाग क्रमांक एल.क्यु. एन. 347/ एच. दि. 10 ऑक्टोंबर 1973 व दि. 19 ऑक्टोंबर 1974 या निर्णयाने संपादित केलेली परंतु त्या कामासाठी लागत नसलेली जमिन ही मुळ मालकांना परत किंवा भाडे करारावर दयावी असे धोरण आहे. मात्र मुळ शासन निर्णयानुसार नवीन शासन निर्णयामध्ये विसंगती स्पटपणे दिसून येत आहे. तरी सदर जमिन मुळ मालकांना परत देण्यासंदर्भात योग्य निर्णय व्हावा, अशी मागणीही या निवेदनामध्ये दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भेटीत नमूद केले.

पुण्यात विखे पाटलांबरोबर लवकरच बैठक!

या भेटीत दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी पुणे येथे उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीचे पदाधिकारी व काही शेतकऱ्यांसमवेत तुंम्ही वेळ देऊन बैठक आयोजित करावी, अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटील यांना केली. त्यानुसार पुणे येथे या संदर्भात लवकरच संयुक्त बैठक होणार आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!