PM Modi Plane Emergency Landing : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसाम दौऱ्याने आज भारताच्या सामरिक आणि पायाभूत सुविधेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. दिब्रुगडमधील मोरन बायपास येथे पंतप्रधानांचे विमान चक्क एका महामार्गावर उतरले. ईशान्य भारतातील ही पहिलीच ‘आपत्कालीन लँडिंग सुविधा’ (ELF) असून, या ऐतिहासिक क्षणानंतर भारतीय हवाई दलाने चित्तथरारक युद्धकौशल्याचे प्रदर्शन केले.
ब्रह्मपुत्रेवर स्थापत्यशास्त्राचा चमत्कार
पंतप्रधानांच्या हस्ते आज ईशान्येतील पहिल्या ‘एक्स्ट्राडोज्ड’ पुलाचे उद्घाटन करण्यात आले. गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटीला जोडणारा हा सहा-लेनचा भव्य पूल सुमारे ३,०३० कोटी खर्चून उभारण्यात आला आहे. हा पूल केवळ प्रवासाचे अंतर कमी करणार नाही, तर आधुनिक अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना म्हणून ओळखला जाईल.
#WATCH असम में एक ऐतिहासिक पल देखने को मिला, जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी डिब्रूगढ़ के मोरन बाईपास पर इमरजेंसी लैंडिंग फैसिलिटी (ELF) पर उतरे। यहां, वे फाइटर प्लेन, ट्रांसपोर्ट और हेलीकॉप्टर का हवाई प्रदर्शन देखेंगे। ELF नॉर्थईस्ट इंडिया में अपनी तरह का पहला है।
(वीडियो: DD) pic.twitter.com/wyc7OnVbMc
— ANI_HindiNews (@AHindinews) February 14, 2026
शिक्षण आणि डिजिटल क्रांतीचा नवा टप्पा
आसामच्या शैक्षणिक आणि तांत्रिक विकासाला गती देण्यासाठी पंतप्रधानांनी दोन मोठ्या प्रकल्पांची भेट दिली. व्यवस्थापन शिक्षणाला जागतिक दर्जा देण्यासाठी आयआयएमच्या तात्पुरत्या कॅम्पसचे उद्घाटन करण्यात आले. कामरूप जिल्ह्यातील अमीनगाव येथे राष्ट्रीय डेटा सेंटरचे लोकार्पण झाले. यामुळे दुर्गम भागातील सरकारी सेवा अधिक वेगवान आणि डिजिटल होतील.


