Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rajpal Yadav : राजपाल यादवला ‘या’ व्यक्तीने केली १.११ कोटींची मदत; तरीही कोट्यवधींचं कर्ज बाकीच

Rajpal Yadav : राजपाल यादवला ‘या’ व्यक्तीने केली १.११ कोटींची मदत; तरीही कोट्यवधींचं कर्ज बाकीच

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादव सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडला असून चेक बाऊन्स प्रकरणात त्याने तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले आहे. एका चित्रपटासाठी घेतलेले मोठे कर्ज फेडण्यात अपयश आल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाली. तुरुंग अधिकाऱ्यांसमोर तो भावूक होत “मी एकटा पडलोय, माझ्याकडे पैसे नाहीत, मित्रही नाहीत,” अशी व्यथा मांडल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणानंतर अभिनेता सोनू सूदने सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांना राजपालच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्याने स्वतःही काही आर्थिक मदत केली. त्यानंतर आता ‘जेमट्युन्स म्युझिक’ कंपनीचे मालक इंदरजीत सिंह यादव यांनी तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

‘IANS’शी बोलताना इंदरजीत सिंह यादव म्हणाले, “राजपालजींनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांना खूप आनंद दिला आहे. ते भारतीय चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा भाग आहेत. ही मदत पैशांपेक्षा गरजेच्या वेळी आपल्या माणसाच्या पाठिशी उभं राहण्याबद्दल आहे. इंडस्ट्री हे एक कुटुंब आहे आणि संकटकाळी कुटुंबीय एकमेकांसोबत उभे राहतात.” त्यांनी इन्स्टाग्रामवरून इतर कलाकारांनाही मदतीचे आवाहन केले आहे. याआधी सोनू सूद, गुरमीत चौधरी आणि जनशक्ती जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेज प्रताप यादव यांनीही राजपालला मदत केली आहे.

दरम्यान, २०१० साली राजपाल यादवने ‘एम. एस. मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’कडून ‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याने त्याला मोठा आर्थिक फटका बसला. व्याज, दंड आणि विलंब शुल्कामुळे थकबाकीची रक्कम जवळपास ९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. कर्जफेडीसाठी दिलेले अनेक धनादेश बाऊन्स झाल्याने नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यानुसार त्याच्यावर फौजदारी कारवाई सुरू झाली.

दिल्ली उच्च न्यायालयाने २ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार राजपाल यादवने ४ फेब्रुवारीपर्यंत आत्मसमर्पण करणे अपेक्षित होते. अखेर ५ फेब्रुवारी रोजी त्याने तुरुंगात हजेरी लावली. दरम्यान, मिळालेल्या मदतीनंतरही त्याच्यावर अजूनही मोठी थकबाकी बाकी असल्याची माहिती आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!