Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रक-डिझेल टँकरच्या धडकेत चालकाचा होरपळून मृत्यू

Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रक-डिझेल टँकरच्या धडकेत चालकाचा होरपळून मृत्यू

Accident News : समृद्धी महामार्गावर मध्यरात्री पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेनेज क्रमांक ५३२ जवळ ट्रक आणि डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरची जोरदार धडक झाली. या अपघातानंतर डिझेल टँकरने अचानक पेट घेतला. भीषण आगीत टँकर चालकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला असून ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात कोपरगाव तालुक्यातील देर्डे आणि सिन्नर तालुक्यातील पाथरे गावांच्या दरम्यान घडला. धडकेनंतर टँकरमधील डिझेलमुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे परिसरात मोठ्या स्फोटाचा धोका निर्माण झाला होता.

घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगरपरिषद, कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दल तसेच समृद्धी महामार्गाच्या रेस्क्यू पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी जिवाची बाजी लावत सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर भीषण आगीवर नियंत्रण मिळवले.

या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आहे. दरम्यान, टँकरमध्ये चालकाव्यतिरिक्त अन्य कोणी प्रवासी होते का, याचा अधिक तपास सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस करत आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!