Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Smriti Mandhana Palash Muchhal: स्मृती मंधाना-पलाश मुच्छल यांचे पॅचअप? मुंबईत हॉटेलबाहेर दोन्ही कुटुंब एकत्र; व्हिडीओमुळे लग्नाच्या चर्चांना उधाण

Smriti Mandhana Palash Muchhal: स्मृती मंधाना-पलाश मुच्छल यांचे पॅचअप? मुंबईत हॉटेलबाहेर दोन्ही कुटुंब एकत्र; व्हिडीओमुळे लग्नाच्या चर्चांना उधाण

Smriti Mandhana Palash Muchhal : लग्नाच्या फक्त एक दिवस आधी टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या मैत्रीच्या नात्यात देखील मिठाचा खडा पडला अन् पाच वर्षाच्या प्रेमाला वादाची किनार लाभली. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह 23 नोव्हेंबर 2025 रोजी निश्चित झाला होता. लग्नापूर्वीचे सर्व विधी पूर्ण झाले होते, मात्र मुख्य सोहळ्याच्या वेळी स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले, अशी माहिती समोर आली. परंतू पलाश आणि स्मृती यांच्या नातात्यात कटुता निर्माण झाली होती. अशातच आता दोघांमध्ये पुन्हा पॅचअप झालंय का? असा सवाल विचारला जातोय.

स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास अन् पलकची भेट
पलाश आणि स्मृती पुन्हा एकदा लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या व्हिडिओमुळे स्मृती आणि पलाशच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकतेचे वातावरण निर्माण झालं आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना हे मुंबईतील एका पॉश रेस्टॉरंटबाहेर दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत पलाशची बहीण आणि प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल व तिचा पती मिथुन देखील स्पॉट झाले. या व्हिडिओमध्ये पलक मुच्छलने स्मृतीच्या वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्याचे पाहायला मिळालं.

दोघांमधील जुने वाद मिटले
दरम्यान, दोन्ही कुटुंबांमधील ही जवळीक पाहून त्यांच्यातील जुने वाद मिटले असून आता पुन्हा एकदा लग्नाची बोलणी सुरू झाल्याचे तर्क लावले जात आहेत. सोशल मीडियावर मात्र, या व्हिडीओमुळे अनेक चर्चांना उधाण आलंय. “सर्व खरं आहे का? पुन्हा लग्न होणार का?”, तर काहींनी हा जुना व्हिडिओ असावा असा संशय व्यक्त केला आहे. “पलाशला दुसरी संधी दिल्याबद्दल स्मृती तुझे आभार,” तर दुसऱ्याने लिहिले, “पलाश कसाही असला तरी पलक खूप चांगली आहे”, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!