Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Latur Crime : लातूर हादरलं! कौटुंबिक वादातून महिलेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Latur Crime : लातूर हादरलं! कौटुंबिक वादातून महिलेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Latur Crime : कौटुंबिक कलहातून एका विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना औसा तालुक्यातील खरोसा येथे घडली आहे. रविवारी, १९ एप्रिल रोजी रात्री निकिता अमरदीप भुरे (वय २५) या महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, एकाच वेळी मायलेकांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबीयांवर आली.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, निकिता भुरे या गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वादा मुळे तणावात होत्या. रविवारी रात्री त्यांनी टोकाचे पाऊल उचलत ग्रामपंचायतीजवळील विहिरीत दोन्ही मुलांसह उडी घेतली.

या घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. किल्लारी पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तिन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी लामजना येथील आरोग्य केंद्रात पाठवले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येमागच्या नेमक्या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!