Today मंगळवार, 28th एप्रिल 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गोपीचंद पडळकर महान नेते, ‘डोनाल्ड ट्रम्प’ यांच्या लेव्हलचे; विश्वजीत कदमांचा मिश्किल टोला

गोपीचंद पडळकर महान नेते, ‘डोनाल्ड ट्रम्प’ यांच्या लेव्हलचे; विश्वजीत कदमांचा मिश्किल टोला

Sangli Politics : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी मिश्किल शैलीत प्रत्युत्तर देत सांगलीच्या राजकारणात नवा रंग भरला आहे. कदम यांनी हात जोडून आणि हसतच पडळकरांना “महान नेते” म्हणत थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्तराशी तुलना केली.

सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडळकर यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांच्यावर गंभीर आरोप करत तिकीट वाटपात गैरप्रकार झाल्याचा दावा केला होता. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना कदम यांनी उपरोधिक शैलीचा वापर करत विषय हलक्याफुलक्या पद्धतीने हाताळला.

“पडळकर हे खूप मोठे नेते आहेत. ते ट्रम्प यांच्या लेव्हलचे आहेत. आम्ही सामान्य लोक त्यांच्या स्तरावर जाऊन बोलू शकत नाही,” असा टोला कदम यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, पडळकर यांनी “माझ्या भीतीमुळेच विरोधक एकत्र आले आहेत” तसेच “यांना जास्त ज्ञान नाही” अशी टीका केली होती. त्यासोबतच सांगली लोकसभा उमेदवारीवरूनही त्यांनी मोठा दावा करत विशाल पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट मिळणार नाही, हे आधीच ठरले होते, असा आरोप केला.

या पार्श्वभूमीवर कदम-पडळकर वाद अधिक चिघळण्याची शक्यता असून, पुढील प्रतिक्रिया काय येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!