Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Uddhav Thackeray : ‘ऑपरेशन टायगर’ रोखण्यासाठी ठाकरेंची रणनीती? ओमराजेंच्या घरी दोन आमदारांची मध्यरात्री गुप्त बैठक

Uddhav Thackeray : ‘ऑपरेशन टायगर’ रोखण्यासाठी ठाकरेंची रणनीती? ओमराजेंच्या घरी दोन आमदारांची मध्यरात्री गुप्त बैठक

Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू असताना, उद्धव ठाकरे यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी मध्यरात्री मोठी राजकीय खेळी केल्याची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांनी रात्री उशिरा ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार दोन्ही नेते तातडीने पुण्यात दाखल झाले आणि ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत बंद दाराआड सविस्तर चर्चा केली. गेल्या काही दिवसांपासून ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटापासून दूर जात असल्याच्या चर्चांना वेग आला असून, त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना वरुण सरदेसाई यांनी सांगितले की, ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत घडलेल्या अलीकडील घडामोडी अपेक्षित नव्हत्या. पक्षाचा सचिव म्हणून आपण त्यांची भेट घेतली असून काही विषयांवर चर्चा झाली आहे. मात्र, सर्व बाबी सार्वजनिकपणे सांगणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ओमराजे आजही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, आमदार कैलास पाटील यांनी ओमराजेंची मनधरणी होईल, असा विश्वास व्यक्त केला. “उद्धव साहेबांचा निरोप घेऊन आम्ही आलो होतो. गेल्या दोन दशकांपासून ज्या विषयासाठी ओमराजे संघर्ष करत आहेत, त्या संदर्भातील भावना आम्ही समजून घेतल्या आहेत. त्यांनी आम्हाला एक दिवसाचा अवधी मागितला असून आम्हाला विश्वास आहे की ते पक्षातच राहतील,” असे कैलास पाटील म्हणाले.

या बैठकीची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्तेही ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानाबाहेर दाखल झाले. यामुळे मध्यरात्री राजकीय हालचालींना अधिक रंग चढला. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटावर टीका करत आपली भूमिका मांडली.

ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे आता राज्याचे लक्ष लागले असून, ते ठाकरे गटात कायम राहणार की नवीन राजकीय वाटचाल स्वीकारणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत त्यांच्या भूमिकेमुळे धाराशिवसह राज्याच्या राजकारणात मोठे परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!