Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात पहाटे गोळीबार; पोलिसांच्या कारवाईत सराईत गुन्हेगार जखमी, वानवडीत चकमकीने खळबळ

पुण्यात पहाटे गोळीबार; पोलिसांच्या कारवाईत सराईत गुन्हेगार जखमी, वानवडीत चकमकीने खळबळ

Pune Crime News : पुण्यातील वानवाडी परिसरात रविवारी पहाटे पोलिस आणि सराईत गुन्हेगारामध्ये थरारक गोळीबाराची घटना घडली. घरफोडीच्या गुन्ह्यात वॉण्टेड असलेल्या आरोपीला पकडण्याच्या कारवाईदरम्यान ही चकमक झाली असून, आरोपी आणि एक पोलीस अधिकारी दोघेही जखमी झाले आहेत.

वानवाडी परिसरात पहाटे सुमारे ५.३० ते ६.०० दरम्यान ही घटना घडली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ३० हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला सराईत गुन्हेगार परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई सुरू केली.

पोलिसांनी आरोपीला घेरण्याचा प्रयत्न करताच त्याने स्वतःजवळील अग्निशस्त्रातून पोलिसांवर गोळीबार सुरू केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिस अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.

या चकमकीत करण सिंग नावाचा सराईत गुन्हेगार जखमी झाला असून त्याला तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झटापटीदरम्यान एक पोलीस अधिकारीही किरकोळ जखमी झाला आहे.

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची सखोल चौकशी करण्यात येत असून, वानवाडी पोलीस ठाण्यात संबंधित गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवरील पोलिसांच्या कारवाईला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!