Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

वाळू चोरी करून नेणारे ट्रॅक्टर पकडले

वाळू चोरी करून नेणारे ट्रॅक्टर पकडले

माहूर : विदर्भ सीमेवरील तालुक्यातील कुपटी, साकुर, हिंगणी, कुदींगडी या परिसरात विदर्भातील चोरटे वाळू चोरी करत असल्याची माहिती मिळाल्यावरून महसूलच्या पथकाने शनिवारी (दि. २१) मध्यरात्री हिंगणी फाट्याजवळ अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग करत ट्रॅक्टर पकडून सदर वाहन तहसील कार्यालयात जमा केले आहे.

माहूर तालुक्यात वळसा घालून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातील ९ असे घाट आहेत ज्या ठिकाणाहून वाळूची तस्करी केली जाते. मात्र, मागील पंधरवड्यात अनेक घाटांचे रस्ते खोदून वाळू तस्करीला महसूले विभागाने आळा घातला आहे. या शिवाय अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध सतत कारवाया सुरू आहेत. तथापि अशा कारवायांना न जुमानता मराठवाडा विदर्भ सिमेलगतच्या गावात विदर्भाच्या बाजूने वाळू तस्कर सक्रीय झाले आहेत. या बाबतची माहिती नायब तहसीलदार कैलास जेठे यांना मिळाली.

त्यांनी केरोळी फाटा, हिंगणी फाटा, ईवळेश्वर ते कुपटी या रस्त्यावर हिंगणी फाटा येथे पाळत ठेवली. सकाळी चारच्या दरम्यान एक ट्रॉली असलेल्या विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर वाळू भरून वन विभागाच्या हद्दीत जंगलातील झाडीत लपवून ठेवलेला दिसला. तेथे उभा असलेल्या चालक गणेश नथू पतंगे याची चौकशी केली असता ट्रॅक्टरमधून वाळू चोरी करून नेत असल्याचे कबूल त्याने दिली. त्यावरून ट्रॅक्टरचा तिथेच नागरिकांना बोलावून पंचनामा करण्यात आला. त्यात त्याने ट्रॅक्टर (एमएच २६ सी इ ७५९६) असल्याचे सांगितले त्यामूळे ट्रॅक्टर तहसील कार्यालय माहूर येथे आणून जप्त करण्यात आला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!