Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कळंबोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार

कळंबोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार

मुंबई: राज्यातील युवकांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कळंबोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार असून त्याचा मोठा लाभ राज्यातील युवकांना होणार आहे. तसेच पुढील टप्प्यात चंद्रपूर येथे ‘एमआयडीसी’च्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी अर्धातास चर्चा उपस्थित केली होती. सदस्य राजेश पवार यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.

उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, राज्यात उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून आतापर्यंत पाच कौशल्य विकास केंद्रे उभारण्यात आली आहेत. टाटा उद्योग समूहाच्या सहकार्याने आणखी सहा केंद्रे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिवेशन संपल्यानंतर एका महिन्याच्या आत चंद्रपूर येथे कौशल्य विकास केंद्रासंदर्भात बैठक घेण्यात येईल.

१९६८ पासून स्थानिकांना रोजगार मिळावा या उद्देशाने धोरण राबविले जात असून उद्योगांना आवश्यक असलेल्या कौशल्यांनुसार प्रशिक्षण देण्यात येत आहे. उद्योग सुरू होऊन स्थानिकांना रोजगार मिळण्यावर भर देण्यात येत असून यासंदर्भात उद्योग विभागामार्फत आढावा घेण्यात येईल. तसेच उद्योजकांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

जिल्हा पातळीवरील उद्योगमित्र समित्यांच्या बैठका नियमितपणे घेण्याबाबत सूचना देण्यात येतील. या समित्यांमध्ये विधिमंडळ सदस्यांचा समावेश करण्यात येईल. तसेच राज्यातील रोजगार उपलब्धतेचा विकास आयुक्तांकडून दर तीन महिन्यांनी आढावा घेण्याचे आदेश देण्यात येतील. याशिवाय उद्योग विभागामार्फत एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजसारखी प्रणाली पुन्हा सुरू करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!