Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News : आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का! दौंडच्या नगरसेवकाचे कुणबी प्रमाणपत्र रद्द

Pune News : आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का! दौंडच्या नगरसेवकाचे कुणबी प्रमाणपत्र रद्द

Pune News : दौंड नगरपरिषदेतील एका नगरसेवकाचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या या निर्णयामुळे संबंधित नगरसेवकाचे पदही धोक्यात आले असून, हा राज्यातील बोगस कुणबी प्रमाणपत्रांवरील कारवाईतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

दौंडमधील प्रभाग क्रमांक 4 मधून ओबीसी आरक्षित जागेवर निवडून आलेले नगरसेवक रोहित राजेश पाटील यांनी निवडणूक लढवताना सादर केलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले आहे. रोहित पाटील यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती.

ओबीसी आंदोलनाचे नेते मंगेश ससाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सादर करण्यात आलेल्या पूर्वजांच्या नोंदी आणि वंशावळीत गंभीर त्रुटी आढळून आल्या. याविरोधात हरकत घेण्यात आल्यानंतर समितीसमोर सुमारे साडेपाच तास सुनावणी झाली. सुनावणीनंतर सादर केलेली वंशावळ चुकीची असल्याचे निष्पन्न झाल्याने समितीने प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयानंतर रोहित पाटील यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अशाच प्रकारच्या प्रकरणांची पडताळणी सुरू असल्याने अनेक लोकप्रतिनिधींना याचा फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे.

मंगेश ससाणे यांनी दावा केला की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक लोकप्रतिनिधींच्या जात प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे भविष्यात आणखी काही प्रकरणांमध्येही मोठे निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या निर्णयामुळे दौंडसह पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!