Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Beed Crime: अंबाजोगाईत कॉलेज तरुणीला जाळ्यात ओढून आळीपाळीने अत्याचार; सोन्या-नाण्यासह लाखोंची खंडणी अन्…

Beed Crime: अंबाजोगाईत कॉलेज तरुणीला जाळ्यात ओढून आळीपाळीने अत्याचार; सोन्या-नाण्यासह लाखोंची खंडणी अन्…

Beed Crime: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे उच्च शिक्षणासाठी आलेल्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून तिच्यावर नराधमांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील रहिवासी असलेली ही तरुणी अंबाजोगाईत शिकत असताना तिची ओळख महेश करपे आणि पवन कराड या दोन तरुणांशी झाली. मात्र, या ओळखीचा गैरफायदा घेत दोघांनी तिचा पाठलाग सुरू केला. एका दिवशी महेशने तरुणीला गाठून तिला जबरदस्तीने मंचुरियन खाण्यास भाग पाडले. या खाद्यपदार्थात आधीच गुंगीचे औषध मिसळलेले असल्याने तरुणी बेशुद्ध झाली आणि याचाच फायदा घेत दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.

पुण्यात नेऊन छळ आणि ब्लॅकमेलिंगचा डाव
हा छळ एवढ्यावरच थांबला नाही, तर संशयित आरोपी पवन कराड याने तरुणीला पुन्हा गुंगीचे औषध देऊन पुण्याच्या एका लॉजवर नेले आणि तिथेही तिच्या असहायतेचा गैरफायदा घेतला. या नराधमांनी अत्याचारादरम्यानचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केले होते. हे फोटो तिच्या कुटुंबीयांना दाखवून बदनामी करण्याची धमकी देत त्यांनी पीडितेकडे पैशांची मागणी सुरू केली. या भीतीपोटी तरुणीने वेळोवेळी तब्बल ३ लाख रुपयांची रोकड आणि साडे नऊ तोळे सोन्याचे दागिने आरोपींच्या हवाली केले.

आरोपी गजाआड, शहरात तीव्र संताप
सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर शनिवारी या पीडित तरुणीने अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही नराधम आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या अमानुष घटनेमुळे अंबाजोगाई शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!