Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Apple मोठ्या तयारीत; स्वस्त MacBook, iPhone आणि iPad लवकरच करणार लाँच

Apple मोठ्या तयारीत; स्वस्त MacBook, iPhone आणि iPad लवकरच करणार लाँच

नवी दिल्ली : सध्या Apple कंपनीकडून अनेक गॅजेट्स आणले जात आहे. त्यात नवीन एंट्री-लेव्हल प्रॉडक्ट्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी पुढील काही महिन्यांत अनेक एंट्री-लेव्हल प्रॉडक्ट्स लाँच करू शकते. यामध्ये बजेट-फ्रेंडली MacBook समाविष्ट असेल, जो कंपनीच्या A-सीरीज प्रोसेसरसह येऊ शकतो.

कंपनी पुढील वर्षी iPhone 16e नंतर आता iPhone 17e देखील लाँच करणार आहे. सध्या, iPhone 16e हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. या दोन प्रॉडक्ट्सव्यतिरिक्त, कंपनी 12 व्या जनरेशनच्या iPad वर देखील काम करत आहे, जो A18 प्रोसेसरसह लाँच होईल. MacRumors च्या रिपोर्टनुसार, Apple पुढील वर्षाच्या सुरुवातीला iPhone, iPad आणि Mac लाइनअपमध्ये नवीन एंट्री-लेव्हल मॉडेल आणू शकतो. iPhone 17e 2026 च्या पुढील काही दिवसांत लाँच होऊ शकतो. यासोबतच, कंपनी 12 व्या जनरेशनचा iPad आणि एक स्वस्त MacBook लाँच करणार आहे.

आगामी एंट्री-लेव्हल मॅकबुकमध्ये A18 प्रो प्रोसेसर असेल. हा प्रोसेसर आयफोन 16 प्रो सीरीजसह लाँच करण्यात आला होता. त्यात 13-इंच डिस्प्ले असू शकतो. कंपनी हे डिव्हाइस निळ्या, गुलाबी, चांदी आणि पिवळ्या कलरमध्ये लाँच करू शकते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!