नवी दिल्ली : सध्या मोबाईलचा वापर वाढला आहे. जवळपास सर्वांकडेच हा फोन पाहिला मिळतो. याचा वापर वाढल्याने अनेक मार्केटिंग कॉल्सही येतात. मात्र, मार्केटिंग सारखे अनेक स्पॅम कॉल्स त्रस्त करतात. मात्र, अशा काही सेटिंग्ज केल्यास तुम्हाला यापासून दूर राहता येऊ शकते. याचीच माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
स्पॅम कॉल्स आणि मेसेजेस विनाकारण त्रास देत असतात. स्पॅम कॉल्स किंवा मेसेजेस हे प्रत्यक्षात बनावट कॉल्स आणि मेसेजेस असतात. कधीकधी, ते बक्षीस विजेते, लॉटरी विजेते किंवा बनावट कस्टमर केअर म्हणून भासवण्याचा प्रयत्न करतात. स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसचा उद्देश आर्थिक नुकसान करणे किंवा बँक तपशील चोरणे आहे. ते तुमचे बँक खाते देखील रिकामे करू शकतात. स्मार्टफोनमध्ये स्पॅम कॉल्स आणि मेसेजेस ब्लॉक करण्यासाठी एक खास पर्याय आहे. हा पर्याय स्पॅम आणि बनावट कॉल्स रोखण्यास मदत करू शकतो.
तुमच्या स्मार्टफोनवरील सेटिंग्ज उघडा. नंतर, कॉलर आयडी आणि स्पॅम किंवा स्पॅम आणि कॉल स्क्रीनवर क्लिक करा. ते आपोआप स्पॅम कॉल्स ओळखेल आणि तुम्हाला ते ब्लॉक करण्यास मदत करेल. व्हॉट्सअॅपमधील स्पॅम कॉल थांबवण्यासाठी, युजर्स अनोळखी नंबरवरून येणारे सर्व कॉल ब्लॉक करू शकतात. यासाठी व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये बदल करणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी, युजर्सना व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल.


