नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात Vivo कंपनीने युजर्ससाठी मोठा बदल केला आहे. कंपनीने आता एक नवीन ऑपरेटिंग सिस्टिम जाहीर केली आहे, जी पूर्वी फक्त चिनी बाजारात उपलब्ध होती. आता, कंपनी सर्व बाजारपेठांमध्ये समान ऑपरेटिंग सिस्टिम देणार आहे.
नवीन ऑपरेटिंग सिस्टिम ही पूर्वीपेक्षा चांगली असेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. आतापर्यंत, विवो फोन फक्त FunTouch OS सह येत होता. पण, आता यामध्ये बदल दिसून येणार आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच कंपनीने एक मोठी घोषणा केली आणि अशा स्मार्टफोनची यादी जारी केली ज्यांना विवोची नवीन ऑपरेटिंग सिस्टिम मिळणार आहे, ज्यामुळे फोनना एक नवीन मेकओव्हर मिळेल. कंपनी आता FunTouch OS ची जागा नवीन ऑपरेटिंग सिस्टिम, ओरिजिन ओएसने घेत आहे.
Android 16 वर आधारित ही ऑपरेटिंग सिस्टिम अनेक नवीन फीचर्स देईल. यात नवीन ओरिजिन स्मूथ इंजिन असून, युजर्संना एक सहज अनुभव देणार आहे. यासाठी, सिस्टिम कोर मॉड्यूल, संगणकीय, स्टोरेज आणि डिस्प्ले ऑप्टिमाइझ करणार आहे. OriginOS 6 मध्ये Origin Animation System असणार आहे. यामुळे व्हिज्युअल अनुभव सुधारेल, असा कंपनीचा दावा आहे.


