नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात तुम्ही iPhone पासून ते AI फोनपर्यंत सर्व काही पाहिले असेल. आता, एक असा नवीन फोन येत आहे ज्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Honor हा फोन आणत आहे. कंपनीने त्याला रोबोट फोन म्हटले आहे. हा फोन त्याच्या एआय उत्पादन इकोसिस्टमचा एक भाग आहे.
कंपनीने एक टीझर लाँच केला आहे. टीझरमध्ये दाखवलेला फोन खूप मनोरंजक आहे. त्यात मल्टी-मॉडल इंटेलिजेंस, रोबोटिक्स आणि नेक्स्ट जनरेशमधील इमेजिंग फीचर्स असणार आहेत. या फोनचे मुख्य फीचर म्हणजे त्याचा कॅमेरा. हा कॅमेरा रोबोट (गिम्बल) सारखा काम करतो. हा कॅमेरा नेहमीच बाहेर येणार नाही. मात्र, एकदा अॅक्टिव्ह झाल्यावर बाहेर पडेल. ही रोबोटसारखी कॅमेरा प्रणाली युजर्ससाठी त्यांच्या डेली रुटीनचे रेकॉर्डिंग करण्यापासून ते विविध कामांमध्ये मदत करण्यापर्यंत विविध कामे करू शकते.
कंपनीने त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर देखील पोस्ट केला आहे. यामध्ये कंपनीने त्यांच्या नव्या स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स आणली आहेत. हा फोन युजर्ससाठी असिस्टंट म्हणून काम करणार आहे. हे नवीन उत्पादन कंपनीच्या HONOR ALPHA PLAN चा भाग आहे, ज्याची घोषणा कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला केली होती. Honor त्यांच्या आगामी रोबोट फोनला AI पुढील पिढी मानत आहे.


