Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

OnePlus लवकरच OnePlus 15 सीरीजमधील स्मार्टफोन करणार लाँच; 32MP फ्रंट कॅमेरा अन् बरेच काही…

OnePlus लवकरच OnePlus 15 सीरीजमधील स्मार्टफोन करणार लाँच; 32MP फ्रंट कॅमेरा अन् बरेच काही…

नवी दिल्ली : सध्या अनेक फोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी OnePlus चा नवा स्वस्तातील फोन आता लाँच केला जात आहे. त्यात Oneplus 15R लवकरच लाँच केला जाणार आहे. हा फोन लाँच होण्यापूर्वी या फोनबद्दल अनेक डिटेल्स समोर आले आहेत. हा ब्रँडचा मिड-रेंज प्रीमियम डिव्हाइस असेल. हा OnePlus फोन 17 डिसेंबर रोजी OnePlus Pad Go 2 टॅबलेटसह लाँच होईल. ब्रँडने OnePlus 15R च्या फीचर्सची माहिती दिली आहे.

या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा असणार आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसर आणि 7400mAh बॅटरीसह लाँच होईल. चीनमध्ये लाँच झालेल्या OnePlus Ace 6 मध्ये 7800mAh बॅटरी आहे. Oneplus 15R मध्ये 165Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट असलेला 1.5K AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. गेम खेळताना हे फायदेशीर ठरेल. कंपनीच्या मते, हा फोन १८०० निट्सच्या पीक ब्राइटनेससह येईल. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ५ प्रोसेसरसह येईल.

या प्रोसेसरसह भारतात लाँच होणारा हा पहिला फोन असेल. कंपनी ७४०० एमएएच बॅटरी देईल. १२० वॅट चार्जिंगला सपोर्ट करण्याचा अंदाज आहे. सुरक्षेसाठी, फोनमध्ये फिंगरप्रिंट आणि फेस लॉक दोन्ही वैशिष्ट्ये असतील. या फोनमध्ये ३२ एमपी फ्रंट कॅमेरा असेल. कंपनी मागील बाजूस ५० एमपी मुख्य लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देईल अशी शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!