Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Samsung च्या नवीन Galaxy M17 5G ची विक्री सुरू; 6 वर्षांसाठी कंपनीकडून दिली जाते…

Samsung च्या नवीन Galaxy M17 5G ची विक्री सुरू; 6 वर्षांसाठी कंपनीकडून दिली जाते…

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात Samsung ने नवीन स्मार्टफोन, Samsung Galaxy M17 5G ची विक्री सुरू केली आहे. हा फोन गेल्या शनिवारी भारतात लाँच करण्यात आला होता. हा एक बजेट फोन आहे. ज्यामध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. 6 वर्षांसाठी कंपनीकडून Android OS अपडेट्स उपलब्ध करून दिले जात आहे.

Samsung च्या Galaxy M17 5G या स्मार्टफोनमध्ये 4GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळत आहे. या स्मार्टफोनची किंमत 12499 पासून सुरू होते. 6GB+ 128GB आणि 8GB + 128GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत 13999 आणि 15499 आहे. या फोनमध्ये 3 महिन्यांचा नो-कॉस्ट EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. Samsung Galaxy M17 5G मध्ये 6.7-इंचाचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा पीक ब्राइटनेस 1100 nits आहे.

सॅमसंगचा हा स्मार्टफोन Android 15 वर One UI 7 वर चालतो. सुरक्षिततेसाठी, यात Samsung चा Knox Vault आहे. Samsung Galaxy M17 5G मध्ये रिअल-टाइम व्हिज्युअल इंटरॅक्शनसाठी सर्कल टू सर्च आणि जेमिनी लाईव्ह यासह अनेक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस फीचर्स उपलब्ध आहेत. ते IP54 रेटेड आहे, ज्यामुळे ते डस्ट आणि वॉटर रेजिस्टंट बनते.

50MP चा कॅमेरा तर सेल्फी…

Samsung Galaxy M17 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यात OIS सह 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. त्यात अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि मॅक्रो लेन्स देखील आहे. त्यात 13MP चा सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!